वेद
वेद हे भारतीय धर्माचे व
संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ.'मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्' अशी वेदाची
व्याख्या करता येईल.जगातील पहिले साहित्य वेद.वेद हे मानवसृष्टीच्या आधी
परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत
अशी वैदिकांची धारणा आहे.ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद यांना वेद अथवा संहिता असे म्हटले जाते.या वेदांचे संहिता, आरण्यके, ब्राह्मणे आणि उपनिषदे असे चार उपविभाग आहेत. यापैकी उपनिषदे ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना 'वेदान्त' असे म्हटले जाते.
शब्दोत्पत्ती
वेद हा संस्कृत शब्द असून तो 'विद्' या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. वेद या शब्दाचा अर्थ 'ज्ञान' असा सुद्धा घेतला जातो. वेदभक्तांच्या दृष्टीने हे ज्ञान पवित्र आणि दैवी ज्ञान आहे. परंतु मूळ रूपामध्ये हा शब्द साहित्य ग्रंथामध्ये एक विशाल राशी-विशेषाचा बोधक आहे. प्राचीन काळी ऋषींना वेद 'दिसले' म्हणून त्यांना वेद असे नाव मिळाले आहे.सत्, चित् आणि आनंद असे ब्रह्माचे स्वरूप असल्याचे वेदांमध्ये म्हटले आहे; म्हणून वेदाला "ब्रह्म" असेही म्हणतात. जो ग्रंथ इप्सित फलाची प्राप्ती आणि अनिष्ट गोष्ट दूर करण्याचा मानवी बुद्धीला अगम्य असा उपाय दाखवून देतो त्याला वेद असे म्हणावे.वेदांचा आविष्कार
वेद असे निर्माण झाले याविषयी अनेक मते आढळून येतात.परमात्मा किंवा ईश्वर या म्हाभूताचे नि:श्वास म्हणजे वेद होत असे बृहदआरण्यक उपनिषदात सांगितले आहे.वेद हे शब्दस्वरूप असल्याने ते आकाशातून उत्पन्न झाले असेही एक मत आहे.वेदांचे महत्व व प्रामाण्य
वेद हे आर्यधर्माच्या मूलस्थानी आहेत. वेदोऽखिलो धर्ममूलम् | असे मनुवचन प्रसिद्धच आहे.वेदांमध्ये तत्कालीन आर्य जनांच्या भौतिक उन्नतीची कल्पना येते.व्यक्ती,समाज आणि राष्ट्र या तीन गोष्टींच्या माध्यमातून आर्यांनी भौतिक उत्कर्ष साधला होता. वेद,स्मृती,सदाचार आणि स्वतःच्या अंतःकरणास जे बरे वाटेल ते, अशी धर्माची चार प्रकारची लक्षणे आहेत.भारतीय आस्तिक दर्शनानी आपापले तत्त्वज्ञान मांडताना वेदांचा आधार घेतला आहे.वेदांचा कालनिर्णय
ख्रिस्ती शतकापूर्वी १००० वर्षांच्या पलीकडच्या काळात वेदरूप काव्ये रचली असावी असे दिसते.काही विद्वानांचे असे मत आहे की छंदांचा काल ख्रिस्ती शकापूर्वी दोन किंवा तीन हजार वर्षापूर्वीचा असावा.लोकमान्य टिळकांनी 'ओरायन'हा ग्रन्थ लिहून वेदकाळासंबंधी आपले मत सविस्तरपणे मांडले आहे. वेदकालाचा निर्णय करण्यासाठी वेद वाक्यांचाच आधार घेतला पाहिजे असे त्यांनी नोंदविले आहे. डॉ.भांडारकर ऋग्वेदाचा काल सनपूर्व २५०० मानतात तर अविनाशचंद्र दास यांच्या मते तो सनपूर्व २५००० इतका मागे जातो.[१]वेदांचे रक्षण व अध्ययन
व्यासांनी वेदांचे प्रवर्तन केले व त्यांच्या शिष्यांनी वेदांचे ग्रहण करून त्यांची परंपरा पुढे चालू ठेवली.हे सर्व शिष्य ज्ञानोपासक होते.वेदांचे अध्ययन करणे,त्यांचे अध्यापन करणे व वेदांचे संरक्षण करणे हे त्यांचे जीवित कार्य होते. मूळच्या वेदमंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ नये यासाठी प्राचीन ऋषींनी अनेक कॢप्त्या योजल्या आहेत. हे वेदमंत्र सस्वर असे टिकावेत यासाठी आणखी एक युक्ती प्राचीन आर्यांनी योजिली आणि ती म्हणजे वेदांच्या विकृती तयार करणे ही होय.वेदांचे स्वरूप
वेदांमध्ये अग्नी,इंद्र,वरूण, उषा,मरुत अशा विविध देवतांची स्तुतीपर सूक्ते आहेत.वैदिक ऋषींनी निसर्गातील वेगवेगळ्या शक्तींना उद्देशून रचलेली ही स्तोत्रेच आहेत.वैदिक काळातील कुटुंब व्यवस्था,लोकजीवन,संस्कृती,आश्रम व्यवस्था , शिक्षण पद्धती ,राष्ट्र दर्शन ,तत्वज्ञान विषयक संकल्पना अशा विविध मुद्द्यांची माहिती आपल्याला वेदांमध्ये अभ्यासायला मिळते.[२]आधुनिक काळातही अभ्यासाची गरज
ख-या अर्थाने वेदांचे रक्षण करायचे असेल तर वेदाचा उच्चार योग्य माणसाने,योग्य वेळी व योग्य परिस्थितीत केल्याने त्यातील खरा अर्थ प्रकट होतो.गुरु शिष्य परंपरेने चालत आलेले हे ज्ञान सांभाळले गेले पाहिजे.उपनिषद
वेदांच्या अखेरच्या रचनेतील ग्रंथ. शब्दश: गुरुंजवळ बसून मिळवलेली विद्या. उप=जवळ, निष=बसणे. श्रीमद्भगवद्गीता हे एक उपनिषद आहे.
प्राचीन भारतीय आर्यांचे तात्विक विचार उपनिषद साहित्यात आढळून येतात.उप या उपसर्गाचा अर्थ आहे ‘जवळ’ आणि सद याचा अर्थ आहे बसणे. गुरुंच्या जवळ परमार्थ विद्या समजून घेणे असा याचा अर्थ आहे.
१. ईश,२. केन, ३. कठ,४.प्रश्न ,५. मुंडक,६. मांडूक्य ,७.तैत्तिरीय,८. ऐतरेय,९.छांदोग्य,१०. बृहदारण्यक,११. नृसिंहपूर्वतापिनी ही प्रमुख उपनिषदे मानली जातात.
वैदिक साहित्यात उपनिषदे ही सर्वात शेवटी येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ असेही म्हटले जाते.काही उपनिषदे गद्यात असून काही पद्यात आहेत.उपनिषदे तत्वज्ञान सांगतात म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असेही म्हणतात.
या साहित्यात प्रामुख्याने धर्म, सृष्टी आणि आत्मा किंवा परमात्मा याविषयी चर्चा केली दिसून येते.
ब्रह्म काय आहे? ब्रह्मप्राप्ती कोणत्या उपायाने होते? आत्मा म्हणजे काय? यांची सविस्तर चर्चा या साहित्यात आहे. मोक्ष कल्पना, नीतिकल्पना, असे विषयही उपनिषद साहित्याने हाताळले आहेत.
सुमारे २०० च्या आसपास काही गौण उपनिषदे मानली गेली आहेत. अथर्वशीर्ष तसेच गीता यांनाही उपनिषद म्हणून गौरविण्यात आले आहे.[१]
उपनिषद सूची-
१३.अक्षमाला १४.अक्षी १५.अथर्वशिखा १६. अथर्व शिरस १७. अद्वयतारक १८.अद्वैत १९.अध्यात्म २०. अन्नपूर्णा २१.अमृतनाद २२.अमृतबिंदू २३ अल्ला २४.अवधूत २५. अव्यक्त २६.आचमन २७.आत्म २८. आत्मपूजा २९.आत्मप्रबोध ३०. आत्मपूजा
एकशें आठ उपनिषदे-
यजुर्वेदाच्या १०९
सामवेदाच्या १०००
आणि
अथर्ववेदाच्या ५० अशा एकूण ११८० शाखागणिक असलेल्या उपनिषदांपैकीं प्रमुख उपनिषदें १०८ आहेत तीं :-
१ ईशावास्य, २ केन, ३ कठ, ४ प्रश्न, ५ मुण्ड, ६ माण्डुक्य, ७ तैत्तिरीय, ८ ऐतरेय, ९ छांदोग्य, १० बृहदारण्य, ११ ब्रम्ह, १२ कैवल्य, १३ जाबाल, १४ श्वेताश्वेतर, १५ हंस, १६ आरुणि, १७ गर्म, १८ नारायण, १९ परम, (हंस) २० (अमृत) बिंदु, २१ (अमृत) नाद, २२ (अथर्व) शिरस्. २३ (अथर्व) शिखा, २४ मैत्रायिणी, २५ कौषीतकी, २६ बृहज्जाबाल, २७ नृसिंहतापिनी, २८ कालाग्निरुद्र, २९ मैत्रेयी, ३० सुबाल, ३१ क्षुरि (का) ३२ मन्त्रिका, ३३ सर्वसार, ३४ निरालंब, ३५ शुक (रहस्य), ३६ वज्रसूचिका, ३७ तेजो - (बिन्दु), ३८ नाद - (बिन्दु ३९ ध्यान-बिन्दु, ४० ब्रह्मविद्या, ४१ योगतत्व, ४२ आत्मबोधक, ४३ (नारद)- परिव्राज्जक, ४४ त्रिशिखि - (ब्राह्मण) ४५ सीता, ४६ (योग) चूडा - (मणि), ४७ निर्वाण, ४८ मण्डल- (ब्राह्मण) ४९ दक्षिणा - (मूर्ती) ५० शरम, ५१ स्कंद, ५२ महानारायण, ५३ अद्वय - (तारक) ५४ राम - (रहस्य) ५५ रामतपन, ५६ वासुदेव, ५७ मुद्र्ल, ५८ शाण्डिल्य, ५९ पिङगल, ६० भिक्षुक, ६१ महा, ६२ शारीरक, ६३ (योग)- शिखा, ६४ तुर्यातीत, ६५ संन्यास, ६६ (परमहंस)- परिव्राजक, ६७ अक्षमालिका, ६८ अव्यक्त, ६९ एकाक्षर, ७० (अन्न)- पूर्णा, ७१ सूर्य, ७२ अक्षिक, ७३ अध्यात्म, ७४ कुण्डिका, ७५ सावित्री, ७६ आत्म, ७७ पाशुपत, ७८ परव्रह्म, ७९ अवधूतक, ८० त्रिपूर तापन, ८१ देवी, ८२ त्रिपुर, ८३ कठ (रुद्र) ८४ भावना, ८५ रुद्र - (ह्रदय) ८६ (योग)- कुण्डली, ८७ भस्म - (जाबाल), ८८ रुद्राक्ष, ८९ गण - (पति) ९० (श्री जाबाल)- दर्शन, ९१ तारसार, ९२ महावाक्य, ९३ पञ्चब्रह्म, ९४ प्राण - (अग्निहोत्र), ९५ गोपाल (पूर्वतापिनी-उत्तरतापिनी), ९६ कृष्ण, ९७ याज्ञवल्क्य, ९८ वराह, ९९ शाठयानीय, १०० हयग्रीव, १०१ दत्तात्रेय, १०२ गुरुड, १०३ कलि (संतराण), १०४ जाबालि, १०५ सौभाग्यलक्ष्मी, १०६ सरस्वती (रहस्या), १०७ बव्ह्रच आणि १०८ मुक्तिकोपनिषद. " अष्टोत्तरशतस्यादौ प्रामाण्यं मुख्यमीरितम. " (रा. गी. १८-३)
हिंदू धर्म
इतिहास
हिंदू संस्कृती ही एक पुरातन संस्कृती आहे. जगातली जी सर्वात जुनी संस्कृती कंबोडियन समुद्राच्या बंदरावर तसेच मेकॉन्ग नदीच्या खोर्यात आणि टोन्ले सॅप सरोवराजवळ उदयास आली. तिचे मूळ सिंधू खोऱ्यामध्ये होते. हिंदू धर्म मानणारी माणसे जगात हिंदू या नावाने ओळखली जातात. सिंधु नदीच्या खोऱ्यात राहणारे ते सिंधू आणि त्याचा अपभ्रंश हिंदू अशी सरधोपट प्रांतीय व्याख्या होती.हिंदू संस्कृतीमध्ये असंख्य पंथ आहेत. त्यांपैकी शैव, वैष्णव, शाक्त, माध्व, गाणपत्य, वारकरी, लिंगायत, दत्तसंप्रदाय, नाथपंथ, महानुभाव पंथ, गोसावी पंथ हे काही आहेत. अन्य धर्मांचा असतो तसा हिंदू धर्माचा, संस्थापक स्वय भगवान/ परमेश्वर आहेत तसेच धर्माची तत्त्वे श्रीमद्भगवत गीता या ग्रंथात विषद आहेतभगवत गीता.
धर्माच्या स्वरूपाचे स्वैर विवेचन
भारतीय संस्कृतीत एकत्रितपणे नांदणाऱ्या वैविध्यपूर्ण पंथ, संप्रदाय, समाज आणि जीवन पद्धतींना एकत्रितपणे हिंदू धर्म असे संबोधले जाते. हिंदुत्व ही संकल्पना जीवनाकडे पहाण्याचा एक दृष्टिकोन विकसित करते. हजारो वर्षांच्या काळात या समाजाने एक संस्कृती, जीवनदृष्टी व त्यावर आधारित एक जीवनपद्धती निर्माण केली आहे. निसर्गातील चर, अचर आणि अनेकविध श्रद्धा, संकल्पना आणि मूल्यांच्या पूजांची परंपरा हीसुद्धा या संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. या संपूर्ण संस्कृतीस मोगलांनी हिंदू धर्म हे नाव दिले गेले .ऐतिहासिक
भारतात विविध संप्रदाय, पंथ होते आणि दर्शनशास्त्राचे (तत्त्वज्ञाना)चे वैविध्य होते. चार्वाक, सांख्य, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वैदिक या दर्शनशास्त्रांना मानणारे ऋषी/गुरू असत, आणि गुरुजनांनी सांगितल्याप्रमाणे कौटुंबिक पातळीवर वर्ण-व्यवसाय निहाय जीवनाची उद्दिष्टे आणि जीवनपद्धती स्वीकारल्या जात. सोबतच जैन आणि बौद्ध या धर्म तत्त्वज्ञानांचेही अस्तित्व होतेच.बौद्ध संप्रदायानंतर
आदि शंकराचार्य यांच्या काळात धार्मिक वादविवाद सत्रांत वैदिकांनी अद्वैत मताचा मोठा पुरस्कार करत वाक् पटुतेच्या बळावर वेद प्रामाण्याची पुनःस्थापना केली. आदि शंकराचार्यांनंतरच्या काळात अनेक वर्षांनी भारतभर भक्ती संप्रदायाच्या चळवळी निर्माण झाल्या. त्या वैदिकांचे अद्वैतमत मोठ्याप्रमाणावर उचलून धरून वैदिकदर्शन समाजात पुन्हा रुजवण्यात सहाय्यभूत ठरल्या. वैदिकांत शाक्त, स्मार्त (शैव) व वैष्णव या मुख्य शाखा असत.परकीय इस्लामी आक्रमण झाल्यामुळे स्वसंरक्षणासाठी शीख संप्रदायाची स्थापना झाली.
जीवनपद्धतीत वैविध्याचा स्वीकार
भारतीय धर्म संकल्पनेतील जीवनपद्धतीचा स्वीकार करताना नीतिशास्त्र आणि न्यायशास्त्र यांची सांगड घालणे अभिप्रेत होते. भारतीय संकल्पनेत मुख्य म्हणजे काही अपवाद वगळता विचारप्रणाली आणि जीवनपद्धतीत वैविध्याचा स्वीकारास मुक्तता होती. मूर्तिपूजाही याच अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा भाग होता. त्यामुळे कोणत्याही दर्शनशास्त्राचे सबळ तत्त्वज्ञान पाठीशी नसतानासुद्धा भारतातील मूर्तिपूजा ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य ठरले. इतकेच नाही तर, मूर्तिपूजेमुळेच हिंदूधर्मीय ओळखले जाऊ लागले.वैदिकांच्या तत्त्वज्ञान, मूर्तिपूजा आणि निरीश्वरवादी मते व स्वातंत्र्य
ज्युडायिक धर्मांमध्ये मूर्तिपूजा नसणे आणि भारतीय जीवन पद्धतीत मूर्तिपूजा ठळकपणे दिसणे. यामुळे भारतीय दर्शनांच्या तात्त्विक बाजूंशी परिचय करून न घेताच परधर्मीयांकडून भारतीयांना हिंदुधर्मी आणि मूर्तिपूजक म्हणून ओळखले जाऊ लागले.ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मगुरूंनी आपले जीवनविषयक आकलन एखाद्या प्रेषिताच्या शिकवणीपुरते, विशिष्ट धर्मग्रंथापुरते किंवा विचारसरणीपुरते मर्यादित ठेवले आहे, त्यांना हिंदू धर्माच्या व्यापकतेची भीती वाटून त्यांनी त्यापासून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला, कारण त्यामुळे त्यांच्या सत्ता स्थानाला धोका उत्पन्न होतो. मग त्यांच्या सोईचे मत त्यांनी हिंदूंवर थापायला सुरुवात केली.
ज्यूडायिक धर्म संकल्पनांनी भारतात त्यांच्या धर्म प्रसारार्थ केलेल्या टीकेस उत्तर देण्याच्या प्रयत्नांतून हिंदूंकडून मूर्तिपूजेच्या स्वातंत्र्याचे तात्त्विक समर्थन केले गेले. वैदिकधर्मी खरेतर मूर्तिपूजक नव्हते, तर अग्निपूजक होते. त्यातही निर्गुण निराकार अद्वैत वैष्णव मताचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेलेला होता.
वैदिकांच्या तत्त्वज्ञानातील मुख्य विरोधी सांख्यांची दर्शने निरीश्वरवादी असतानासुद्धा द्वैत मताच्या परिणामामुळे हा धर्म पाळणारे लोकच स्वाभाविकतेतील सगुणात्मकता स्वीकारतात. सांख्यांमुळे स्वभाव हाच धर्म स्वभाव-धर्म आणि प्रत्येक चराचराचा स्वभाव-धर्म वेगळा आणि त्यातून येणारा अगदी परस्पर विरोधी स्वभाव-धर्मांचा आणि विचारधारांचाही आदर ही धर्माची वेगळीच संकल्पना पुढे आली.
पूर्वमीमांसा ही कर्मकांडाचे (याचा अर्थ मूर्तिपूजेचे असा नव्हे) समर्थन करते तर वैदिक स्वतः मुख्यत्वे निर्गुण निराकार अद्वैत वैष्णव वेदांचे प्रामाण्य मानणारे होते. पण त्यांचे वेदप्रामाण्य हे ज्युडायिक धर्मांप्रमाणे ग्रंथ प्रामाण्यावर नाही तर शब्द प्रामाण्यावर विसंबून होते त्यामुळे वैदिक ग्रंथात समर्थन नसेल किंवा एखाद्या गोष्टीचा विरोध जरी असेल, परंतु प्रत्यक्ष परंपरेत असेल तर परंपरेच्या समर्थनास वैदिकांनी सहसा विरोध केला नाही. शिवाय ह्या परंपरा पालनांचे जातिनिहायच नव्हे तर कुटुंबनिहाय स्वातंत्र्य असल्यामुळे मूर्ती आणि इतर पूजांच्या बाबतीत काही ठिकाणी तत्त्वज्ञान आणि वर्तन यात विरोधाभास असूनसुद्धा हिंदू जीवनपद्धतीत सर्वसमावेशकतेवर भर आहे.
.
व्यक्तिगत स्वातंत्र्य
ज्युडायिक धर्मांच्या ग्रंथप्रामाण्य आणि सामूहिक प्रार्थना पद्धतीच्या तुलनेत भारतीय दर्शनपद्धती व्यक्तीचा व्यक्तिगत-स्वानुभव-श्रद्धा-प्रचितीस अनन्य महत्त्व प्रदान करते. दुसरा महत्त्वाचा फरक ज्युडायिक धर्ममतांत ईश्वर संकल्पना सर्वत्र आहे पण सर्वव्यापी नाही. म्हणजे असे की त्यांच्या मतानुसार प्राणिमात्र अचल वस्तूस ईश्वर नियंत्रित करू शकतो पण त्यात अधिवास करू शकत नाही. हे तत्त्व हिंदू धर्माहून वेगळे आहे.हिंदू संस्कृतीतील धर्माची विचारधारा
भारतीय विचारधारेत ईश्वर चराचरात अधिवासित तर आहेच पण ईश्वर अथवा ग्रंथ शब्द अशा कोणत्याही प्रामाण्यासोबतच व्यक्तीची व्यक्तिगत श्रद्धा आणि व्यक्तिगत मूल्ये यांवर आधारित, व्यक्तिगत कर्तव्य-धर्माच्या प्रामाण्याचेही प्राबल्य असल्याचे मानले जाते. सोबतच मोक्षप्राप्तीच्या हेतूने चार ऋणातून मुक्तता; पितृ, मातृ,आणि गुरुजनांच्या आज्ञांचे पालन, व्यक्तिगत, व्यावसायिक, कौटुंबिक कर्तव्ये पार पाडणे, जातिसमूह आणि त्यांच्यांतील परंपरांचे जसेच्या तसे पालन करणे, आदी जीवन पद्धतीतून समतोल साधणे म्हणजेच धर्म अशी धर्माची वेगळी संकल्पना भारतीय विचारधारेत आढळते. हिंदू सांस्कृतिक परंपरेने अगदी गावपातळीपर्यंत सुस्थिर अशी समाजरचना उभी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.ब्रिटिशोत्तर काळ
ब्रिटिशपूर्व काळातील भारतातील न्यायव्यवस्था राजाचा न्याय अंतिम असला तरी तो मुख्यत्वे परंपरांवर अवलंबून जातपंचायतींच्या अधीन असे. ब्रिटिशोत्तर काळात कायद्याचे राज्य चालवू इच्छिणार्या न्याय व्यवस्थेला स्थानिक संस्कृतीस अनुसरून कायद्यांची आवश्यकता भासल्यानंतर भारतात राज्यकर्त्यांनी कमीतकमी वापरल्या गेलेल्या वैदिकांच्या स्मृतींना पुन्हा उजाळा दिला. ब्रिटिश काळात मॅक्समुल्लर आदी पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांनी वेदांतील आर्य या शब्दाचा संबंध मध्ययुरोपी आर्य समुदायाशी लावतानाच संस्कृत व युरोपीय भाषांत साम्य शोधण्याचे प्रयत्न केले व वैदिक लोक आणि त्यांचा धर्म पाळणारे हिंदू आणि तसल्या जीवन पद्धतीच्या आधाराने जगणारे स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक भारताच्या बाहेरून आले असावेत असा सिद्धान्त मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु अलीकडील आधुनिक जनुकीय चाचण्यांमध्ये सर्व भारतीय एकाच वंशाचे असून हा सिद्धान्त विज्ञानाच्या कसोट्यांवर टिकत नाही असे आढळून आले आहे.हिंदू कर्मकांडे
हिंदू धर्मात पूजापाठादी कर्मे करण्यासाठी अनेक कर्मकांडे निर्माण झाली. या कर्मकांडांसाठी संस्कृत मंत्र म्हटले जातात. अशा मंत्रांतील शब्दांचा अर्थ सांगणारा एक संस्कृत-इंग्रजी शब्दकोश पुणे विद्यापीठातील डॉ. बी.के. दलाई यांनी तयार केला आहे. त्या कोशाचे नाव A Dictionary of Domestic Ritual Terms असे आहे. या कोशात दहा हजारांवर संस्कृत शब्द आणि त्यांच्याशी निगडित क्रिया यांचा समावेश आहे.हिंदू धर्मशास्त्र
हिंदू शास्त्रे | |||||||||||||||||||||||||||||||||||||||
श्रुति | स्मृति | ||||||||||||||||||||||||||||||||||||||
ऋग्वेद | यजुर्वेद | धर्मशास्त्र | इतिहास | ||||||||||||||||||||||||||||||||||||
सामवेद | अथर्ववेद | पुराण | षडदर्शने | ||||||||||||||||||||||||||||||||||||
आगम/ तंत्र | वेदांग, उपवेद | ||||||||||||||||||||||||||||||||||||||
वैदिक साहित्य -
- संहिता म्हणजे मूळ ग्रंथ. संहिता म्हणजे अर्थ संग्रह. याचा अर्थ पदप्रकृति असाही केला जातो . यात स्तोत्रे, काही प्रार्थना आशीर्वादात्मक सूक्ते, मंत्राचे प्रयोग, यज्ञयागांबाबतचे मंत्र, संकट निवारण होण्याबद्दलचे मंत्र व प्रार्थना, देवतांची स्तुती असे घटक येतात.
- ब्राह्मणे - ब्राह्मणे म्हणजे मोठमोठे गद्य स्वरूपातील ग्रंथ आहेत. यांत देवादिकांच्या विविध प्रकारच्या कथा, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये करायच्या क्रियांचे व्यावहारिक व आध्यात्मिक महत्त्व, यज्ञयागांचे विचार अशा प्रकारचे मुद्दे येतात .
- आरण्यके व उपनिषदे - यात अरण्यात राहणाऱ्या ऋषी, संन्यासी लोकांचे मनुष्य, जगत् आणि ईश्वर या विषयांच्या अनुषंगाने मांडलेले विचार आढळतात. आपले प्राचीन तत्त्वज्ञान उपनिषदांत
पुराणे
भारतीय पुराणे म्हणजे इतिहास आहे असे मानले जाते.
स्वरूप
महाभारताप्रमाणे पुराणे ही देव व सिद्ध पुरुष यांच्या कथा होत. एकूण १८ पुराणे व १८ उपपुराणे आहेत. पुराणांमध्ये भौगोलिक वर्णनेही आहेत. तसेच भूकंपाविषयी माहिती मिळते.लक्षणे
पुराण कशाला म्हणावे याची व्याख्या मत्स्यपुराणात केलेली आहे ती पुढीलप्रमाणे - सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वन्तराणि च। वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम्॥- १) सर्ग - सृष्टीची निर्मिती
- २) प्रतिसर्ग - सृष्टीचा लय
- ३) वंश - विविध वंशांची उत्पत्ती व वृद्धी
- ४) मन्वंतर - प्रत्येक मन्वंतराचे वैशिष्ट्य
- ५) वंशानुचरित -
पुराणांची नावे
म-द्वयं भ-द्वयं चैव ब्र-त्रयं व चतुष्टयं|अ-ना-प-लिं-ग-कू-स्कानि पुराणानि प्रचक्षते||
या श्लोकानुसार खालीलप्रमाणे एकूण अठरा पुराणे आहेत.
- मत्स्य
- मार्कंडय
- भविष्य
- भागवत
- ब्रह्म
- ब्रह्मवैवर्त
- ब्रम्हांड
- वराह
- वामन
- वायु
- विष्णू
- अग्नी
- नारद
- पद्म
- लिंग
- गरुड
- कूर्म
- स्कंद
उपपुराणे
- आदित्यपुराण
- औशनस पुराण
- कपिलपुराण
- कालिकापुराण
- दुर्वास पुराण
- नंदीकृत पुराण
- नृसिंहपुराण
- पराशरपुराण
- भागवतपुराण
- मानवपुराण
- माहेश्वरपुराण
- वारुणपुराण
- वाशिष्ठपुराण
- शिवपुराण
- सनत्पुराण
- सांबपुराण
- सौरपुराण
भगवद्गीता
भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध.
त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.
यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.
काही भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. प्रत्यक्षात हा धार्मिक ग्रंथ आहे आणि त्यामुळे तो पवित्र आहे
गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबद्ध भाषांतर आहे.
भगवत् गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे.. हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते.
सामान्यजनांमध्ये भगवत्-गीता, 'गीता' या नावाने ओळखली जाते.
कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.
भगवद्गीतेत असे सांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला तो देव असल्याचे पटवले. (श्रीकृष्णाने असे विश्वरूपदर्शन बालपणी यशोदामातेला आणि वृद्धापकाळी उत्तंक ऋषीलाही दाखविले आहे!)
भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे.
अनुक्रमणिका
गीता निर्मितीचा काळ
महाभारतातल्या 'भीष्म पर्वा'मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५व्यापासून ते ४२व्या अध्यायांत संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायली' जाते.उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतके गीता लिहिली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत तज्ज्ञांमधे एकवाक्यता नाही. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहिती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही परंतु तरीही महाभारतात समाविष्ट असल्याने गीता 'महर्षी व्यास' यांनी लिहिली असे मानले जाते.
छंदाच्या रचनेच्या अभ्यासावरून काही जाणकारांनी असेही मत प्रदर्शित केले आहे की गीता महाभारतात नंतर घालण्यात आली.
हिंदुस्थानातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसर्या पिढीला ठेवा स्वरूपात देण्याची प्रथा असल्याने आधुनिक अभ्यासकांच्या मतापेक्षा गीता कित्येक वर्षे जुनी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे असे मानले जाते. कुठल्याही युगात त्याचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच विद्वानांच्या मते अध्यात्मिकदृष्ट्या गीता कधी लिहिली गेली अथवा कधी सांगितली गेली याला फारसे महत्त्व नाही.
गीतेच्या विविध आवृत्त्या व संबंधित ग्रंथ संपदा
भगवद्गीतेच्या प्रभावातून हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या कालखंडांत इतर विविध गीता निर्माण झाल्या. यात अष्टावक्रगीता, ईश्वरगीता, कपिलगीता, गणेशगीता, पराशरगीता, भिक्षुगीता, व्यासगीता, रामगीता, शिवगीता, सूर्यगीता, हंसगीता, इतकेच काय, पण यमगीताही लिहिली गेली. कूर्मपुराणात उत्तर विभागात पहिल्या अकरा अध्यायांत ईश्वरगीता तर पुढील अध्यायांत व्यासगीता आहे. गणेशपुराणात शेवटच्या क्रीडा खंडात १३८ ते १४९ अध्यायांत गणेशगीता आहे.[१]गीतेतील अध्यायांची नावे
- अध्याय १ - अर्जुनविषादयोग
- अध्याय २ - सांख्ययोग
- अध्याय ३ - कर्मयोग
- अध्याय ४ - ज्ञानसंन्यासयोग
- अध्याय ५ - कर्मसंन्यासयोग
- अध्याय ६ - आत्मसंयमयोग
- अध्याय ७ - ज्ञानविज्ञानयोग
- अध्याय ८ - अक्षरब्रह्मयोग
- अध्याय ९ - राजविद्याराजगुह्ययोग
- अध्याय १० - विभूतियोग
- अध्याय ११ - विश्वरूपदर्शनयोग
- अध्याय १२ - भक्तियोग
- अध्याय १३ - क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
- अध्याय १४ - गुणत्रयविभागयोग
- अध्याय १५ - पुरुषोत्तमयोग
- अध्याय १६ - दैवासुरसंपविभागयोग
- अध्याय १७ - श्रद्धात्रयविभागयोग
- अध्याय १८ - मोक्षसंन्यासयोग